अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा आमने सामने

 


मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवार रुतुजा लटके यांच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांचे  उमेदवार आज (14 ऑक्टोबर) रोजी अर्ज दाखल करतील. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे  शहरातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मतदानासाठी अर्ज दाखल करणार असून त्यांची रॅली सुरु आहे त्यांच्या बरोबर यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार, प्रकाश जाधव, मंत्री दीपक केसरकर आणि अमित साटम यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनेक नेते आहेत. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 14 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे.

त्याचवेळी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने (BMC) स्वीकारला आहे. ऋतुजा लटके 2006 पासून बीएमसीमध्ये कार्यरत होत्या. आता त्या ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यापण थोड्याच वेळात अर्ज दाखल करतील या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. तर अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपला  बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा पाठिंबा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने