योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरे देईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


“आज राज्यात टाटा एअरबसवरून जो काहूर माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला उत्तर उद्योगमंत्री देत आहेत, योग्य वेळेला मी सुद्धा याची उत्तरं देईल. भविष्यात या राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्रात उद्योग देण्याचे आश्वासन दिले आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे नंदूरबारमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच या क्रार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ‘परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाही’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “आज राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही जी नुकसान भरपाई दिली आहे. ती आजवरच्या इतिहासातली सर्वात मोठी नुकसान भरपाई आहे. आमच्या मंत्रीमंडळाने नियम डावलून शेतकऱ्यांना मदत केली आहे. जे शेतकरी निकषात बसत नव्हते, त्या शेतकऱ्यांनाही आम्ही मदत देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही सहा हजार कोटींची नुकसान भरपाई दिली. त्यामुळे त्यांनी आकडे पहावे आणि टीका करावी”

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले कि,“राज्यातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी आम्ही उपाय योजना करत आहोत. लवकरच राज्यात मोठी पोलीस भरती होणार आहे. इतर विभागातही ७५ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने