निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह व नाव तात्पुरत्या स्वरूपात गोठवले असून अंधेरीच्या निवडणुकीत ठाकरे किंवा शिंदे गटाला हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत या प्रकाराला उत्तर दिले आहे.
निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जात असून. शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यावर संताप व्यक्त करत शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले आहे "खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!", अशा प्रकारे त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा