उद्धव ठाकरे गटाने पक्षासाठी सादर केला तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव.

 


केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही गोठवण्याचा निर्णय शनिवारी दिला. त्यानंतर आता ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माहिती दिली.

उद्धव ठाकरेंनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचे फोटो दाखवत सांगितले आम्ही चिन्हासाठीचे हे तीन पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत. त्याचसोबत त्यांनी पक्षासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत.असे सांगितलं.

अंधेरीची पोटनिवडणूक लागली असून, अर्ज भरण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर एक चिन्ह आणि एक नाव द्या दयावे अशी विनंती निवडणूक आयोगास केली असल्याचे देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केले. "निवडणूक आयोगाने शिवसेनेने दिलेली तीन चिन्ह आणि तीन नावे जनतेला सांगितली आहेत. मात्र, शिंदे गटाने काय सादर केलं, याची माहिती दिली नाही,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने