जीवे मारण्याच्या धमक्यांना मी घाबरणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणावर म्हटलं आहे की, मी अशा धमक्यांकडे लक्ष देत नाही. आमचे गृह खाते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. अशा धमक्यांना मी घाबरणार नाही, तसेच मला जनतेसाठी काम करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 

विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्मघातकी स्फोटाद्वारे सीएम शिंदे यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी धमकीचे पत्रही मिळाले आहे. याशिवाय फोनवरून देखील त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत. या धमकीला गांभीर्याने घेत प्रशासनाने सीएम शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

गुप्तचर विभागाला शनिवारी संध्याकाळी धमकीची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही अशी माहिती मिळाल्याला दुजोरा दिला आहे. एका मीडिया हाऊसने हे वृत्त दिले आहे  तसेच  माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गुप्तचर आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाणे येथील खाजगी निवासस्थान आणि मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर 5 ऑक्टोबर रोजी शिंदे पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने