अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल हे पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा खासदार आहेत.आता त्यांच्याच मतदार संघातील काही नागरिकांनी सनी देओल हरवले असल्याचे पोस्टर शहरभर लावले आहेत. घरांच्या भिंती, रेल्वे स्थानक आणि वाहनांवर हे पोस्टर्स चिटकवले आहेत. सनी देओल यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर ते लोकांना कधी भेटलेच नाही असं मतदारांचे म्हणणे आहे. शिवाय ते कधीही आपल्या मतदारसंघात गेले नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सनी देओलबद्दल प्रचंड नाराजी आहे.
याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे खासदारावर नाराज असलेल्या एका स्थानिक तरुणाने ANI ला सांगितलं, “जर त्यांना काम करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खासदार झाल्यानंतर ते कधीही गुरुदासपूरला आले नाहीत. ते स्वतःला पंजाबचे सुपुत्र म्हणवतात पण त्यांनी कोणताही औद्योगिक विकास केला नाही. खासदार निधीचे वाटप केले नाही. केंद्र सरकारची कोणतीही योजना येथे आणलेली नाही."
टिप्पणी पोस्ट करा