T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. आज यातील पहिला सामना भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर स्पर्धा होणार आहे. हा सराव सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल.
भारतीय संघाने यापूर्वी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध दोन सराव सामने खेळले होते,यापैकी एक सामना भारताने जिंकला आणि एक हरला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका 0-2 ने गमावली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 25 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 14 वेळा आणि ऑस्ट्रेलियाने 10 वेळा विजय मिळवला आहे. आजच्या होणाऱ्या सराव सामन्यात या दोन्ही संघांमध्ये धमाकेदार खेळाची अपेक्षा आहे.
वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये विराट कोहलीने विश्रांती घेतली होती. त्याचवेळी रोहित शर्माही दुसरा सामना खेळला नाही. आता हे दोघे या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी किती फिट हेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कळेल. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहच्या जागी शमीचा टी-20 वर्ल्डसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सराव सामन्यात टीम इंडियाला डेथ ओव्हरची गोलंदाजी सुधारण्याची संधी आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने शेवटच्या काही षटकांमध्ये थोडी सुधारणा केली होती. यादरम्यान हर्षल पटेलने प्रभावी गोलंदाजी केली. फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही शानदार खेळ दाखवत दुसऱ्या सामन्यात तीन बळी घेतले.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया देखील आपली कामगिरी उंचावण्यास उत्सुक असेल. केन रिचर्डसन, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी चिंतेचा विषय आहे. मॅक्सवेलला कडून सराव सामन्यात चांगली कामगिरीहोईल अशी आशा आहे.
टिप्पणी पोस्ट करा