काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर पक्षाच्या मुख्यालयात आले होते पण अर्ज भरताना ते एकटे पडल्याचे चित्र दिसले. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोर ‘जी-२३’ गटातील एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता. परंतु ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांचीही खर्गे यांच्या नावाला पसंती असल्याने तेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुख्य लढत हि मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. सोनिया गांधी यांचा खर्गे यांच्या उमेदवारीला आशीर्वाद असून हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी शनिवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. एक वृत्त वहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. उदयपूरमध्ये झालेल्या ‘एक नेता, एक पद’ ठरावाचं पालन करत खर्गे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याचे समजते.
खर्गे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खर्गेची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खर्गेनी सांगितलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांनीच खर्गे यांच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खर्गे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले असे समजते. खर्गे यांच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांची नावं चर्चेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा