धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा उद्या फैसला येणार ?

 


शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह धनुष्यबाणबाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.निवडणूक आयोग बहुमताच्या नियमाच्या आधारे हा वाद सोडवणार असं दिसत असून कदाचित  उद्या याबाबत ते आपला निर्णय जाहीर करतील. त्यामुळे बहुमत कुणाकडे आहे याचे उत्तर उद्या  मिळेल आणि जर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेलं तर दोन्ही पक्षाकडून  दुसरं चिन्ह काय असेल याची उत्सुकता सर्वाना आहे. 

काल झालेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आपला मेळावा मोठा  व्हावा यासाठी दोन्ही बाजूंकडून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये गर्दीची गणितं जमवण्यात यश आलं. यातच शिंदेंनीच्या मेळाव्यात तलवारीचे प्रदर्शन करण्यात आले, ते पाहता धनुष्यबाणाच्या चिन्हला शिंदे गटांनी पर्याय शोधला आहे का ह्या चर्चा सुरु झाल्यात.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने