मॉस्कोहून दिल्लीला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर घबराट पसरली होती. मॉस्कोहून येणारे हे विमान पहाटे 3.20 वाजता विमान दिल्ली विमानतळावर उतरले. यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना खाली उतरवण्यात आले. यानंतर फ्लाइटची तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 11.15 वाजता मॉस्कोहून दिल्लीला येत असलेल्या फ्लाइट क्रमांक SU 232 मध्ये 3:20 वाजता बॉम्ब असल्याची माहिती मिळाली.
विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर बॉम्बशोधक पथक, बचाव पथके तैनात करण्यात आली. विमान धावपट्टी 29 वर उतरले. सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात बॉम्ब सापडला नाही. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. फ्लाइटमध्ये 386 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर्स होते.
टिप्पणी पोस्ट करा