धनुष्यबाण चिन्हाचा फैसला सोमवारी येणार ?

 


निवडणुक आयोग (Election Commission) धनुष्यबाण चिन्हाचा फैसला सोमवारी देणार आहे. यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला अंधेरी पोटनिवडणुकी पूर्वीच होण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर केल्यानंतर आज दिल्लीत निवडणुक आयोगाची बैठक निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात झाली. ही बैठक तब्बल 4 तास सुरु होती. 

कालच्या निवडणूक आयोगाच्या पत्रानंतर शिवसेनेने (ठाकरे गट) कागदपत्रांचा 700 पानांच गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. अंधेरी पूर्व मतदार संघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हावर त्वरित सुनावणी घेऊ नये अशी शिवसेना (ठाकरे गट) यांची मागणी आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने