परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी इजिप्तच्या विश्वासार्हतेवर विश्वास व्यक्त केला आणि अनेक प्रसिद्ध भारतीय कंपन्या इजिप्त देशात गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत हे अधोरेखित केले. भारत-इजिप्त बिझनेस फोरमला संबोधित करताना, जयशंकर म्हणाले, "इजिप्त सारख्या देशात भारतातील प्रतिष्ठित कंपन्या येत आहेत, आणि गुंतवणुकीसाठी इथल्या शक्यतांचे मूल्यांकन करत आहेत. मला वाटते की हे भारतीय कंपन्यांबद्दल आणि गुंतवणूकीचे ठिकाण म्हणून इजिप्तची विश्वासार्हता याबद्दल बरेच काही सांगते. मला इथे शक्यतांचे जग दिसत आहे."
दरम्यान, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी भारताला व्यापारातील उलाढाल वाढविण्याचे आवाहन केले आणि सध्याचा महसूल पुरेसा नसल्याचेही सांगितले. याबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले."अध्यक्ष सिसी यांनी मला सांगितले भारत व इजिप्त मधील व्यापाराची उलाढाल पुरेसी आहे असे त्यांना वाटत नाही. त्यामुळे ते वाढवण्याचे मार्ग शोधण्याचा त्यांनी आम्हाला आग्रह केला ” भारत आणि इजिप्तमध्ये झालेल्या गहू कराराबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले, "इजिप्तने भारताकडून गहू विकत घेण्याचे कदाचित हे पहिलेच वर्ष आहे, परंतु दुर्दैवाने, आमच्यायेथे शेतीसाठी हवामानानुसार हे वर्ष कठीण ठरले आणि त्यामुळे काही भरीव प्रारंभिक पुरवठा आम्ही चालू ठेवू शकलो नाही."
14 एप्रिल 2022 रोजी इजिप्तला गव्हाचा पुरवठा करू शकणार्या मान्यताप्राप्त राष्ट्रांच्या यादीत भारताचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे दीर्घकाळापासूनचा गैर-शुल्क अडथळा संपला. इजिप्तने भारताकडून 180,000 टन गहू खरेदी करण्याचा करार केला आहे, हा करार त्याच्या गव्हाच्या पुरवठ्यात विविधता आणण्याच्या देशाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. मे महिन्यात इजिप्तने भारताकडून 500,000 टन गहू खरेदी करण्याचे मान्य केले होते परंतु करारावर स्वाक्षरी झाली नव्हती. देशांतर्गत उत्पादन कमी झाल्यामुळे भारताने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती, परंतु इजिप्तसारख्या देशांना या मधीं सूट दिली होती
टिप्पणी पोस्ट करा