आमदार संजय शिरसाट यांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला हलवले

 


ब्युरो टीम : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावरून आज सकाळी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला नेण्यात आले आहे. यावेळी औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती ठीक नाही. 

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना काल सोमवारी औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली. संजय शिरसाट यांच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. 

संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने