बिडेन यांच्या वक्तव्यानंतर देखील, पाकिस्तान आपले अण्वस्त्र सुरक्षित करू शकेल असा अमेरिकेला विश्वास

 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या "पाकिस्तान जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक आहे " या वक्तव्यानंतर, पाकिस्तानकडून दहशतवादी गटांविरुद्ध सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा असल्याचा अमेरिकेने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी सोमवारी याविषयी पत्रकार परिषदेत भाष्य केले त्यांनी सांगितले, 'आम्ही पाकिस्तानसोबत दहशतवाद निपटून काढण्यासाठी मजबूत भागीदारी करू इच्छितो आणि पाकिस्तान देशाकडून सर्व दहशतवादी व त्यांचे गट याच्याविरुद्ध सतत कारवाईची अपेक्षा करतो. तसेच आम्ही सर्व प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादी धोके दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या सहकार्याची अपेक्षा करतो."

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन हे कॅलिफोर्नियातील एका सभेला संबोधित करत असताना 'पाकिस्तान कदाचित जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक आहे.' असे भाष्य केले होते ते मोक्रॅटिक कॉंग्रेसनल कॅम्पेन कमिटीच्या रिसेप्शन मध्ये बदलत्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीबद्दल  बोलत होते. अमेरिकेच्या अध्यक्षांनी पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या सुरक्षाबाबत चिंता देखील व्यक्त केली.

विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी पाकिस्तानचे "जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक" असे वर्णन केल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या देशातील  अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लोम यांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केले होते. त्यानंतर लगेच अमेरिकेने रविवारी पाकिस्तानच्या अण्वस्त्रे सुरक्षित करण्याच्या क्षमतेबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या विधानावर माघार घेतली आणि म्हटले की पाकिस्तान देश आपली अण्वस्त्रे सुरक्षित करू शकतो.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने