भाजपाची अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून माघार नाही ?

 


अंधेरी मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटी तारीख आहे त्यामुळे आता फडणवीस आणि भाजपाचे केंद्रीय नेते यांनी याबद्दल काय निर्णय घेतला, हे पाहणं महत्त्वाचं आहे. काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहलेले पत्र, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेलं आवाहन यानंतर बाळासाहेबांची शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेलं पत्र हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीवर राजकीय दबाव वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. रात्री दीड तास या संदर्भात भाजपा नेत्यांची फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी चर्चा झाली. फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाचे नेते निवडणूक लढवण्यावर ठाम दिसत असल्याचं या बैठकीमध्ये दिसून आलं. मात्र या निवडणुकीबद्दलचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत असे समजते. 

या आधी रविवारी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या पत्रावर भूमिका स्पष्ट करताना म्हंटले होते, 'राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने पत्र पाठविले असले तरी आता शेवटच्या क्षणी काही भूमिका घ्यायची असेल तर एकटय़ाला निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी पक्षात चर्चा करावी लागणार आहे, वरिष्ठांशी बोलावे लागणार आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चेअंती घेतला जाईल.' परंतु एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला असता भाजप हि पोटनिवडणूक लाढवण्यास ठाम असल्याचे दिसते 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने