इंदूर येथील ५० वर्षीय मौलानाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.

 


मध्यप्रदेश इंदोर येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे, चंदननगर  पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार प्राप्त झाली असून एका मदरशाचा संचालक असलेल्या 50 वर्षीय मौलाना याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्या बाबत ANI या वृत्त संस्थेला प्रशांत चौबे, एडीसीपी, इंदूर यांनी माहिती दिली असून त्यांनी सांगितले " एका 15 वर्षीय तरुणीने चंदन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे, त्यात तिने सांगितले की ती मदरशात शिकण्यासाठी जात असे. मदरशाचा संचालक हा 50 वर्षीय मौलाना आहे, तो तिला एका खोलीत वेगळे बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य करायचा"

त्यांनी पुढे सांगितले "त्या मुलीचे कुटुंबीय मौलानाशी याबाबत बोलण्यासाठी गेले असता त्याने त्यांना मारहाण केली. आता यामध्ये POCSO कायदा 354 प्रमाणे आणि मारहाणीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल" या घटनेची नोंद मध्यप्रदेश इंदोर येथील चंदननगर  पोलिस ठाण्यात झाली आहे  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने