वास्तुशास्त्रामध्ये (Vastu Shastra) वनस्पतींबाबत असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, जे तुमची आर्थिक स्थिती (Economic Condition) सुधारण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका झाडाविषयी सांगणार आहोत, ज्याची फुले घऱात असल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होऊ शकते. ते झाड म्हणजे पळस. पळसाच्या फुलांना तेसू फुले असेही म्हणतात.माता लक्ष्मीला पळसाची फुले खूप प्रिय आहेत. घरात हे फूल ठेवल्याने अनेक फायदे (Benefits) होतात.
ज्योतिषी सांगतात, तेसूच्या फुलात देवदेवता वास करतात. त्याची दैवी शक्ती आणि चमत्कार व्यक्तीच्या सर्व समस्या संपवू शकतात. तेसू फूल दिसायलाही खूप सुंदर असल्याने ते घराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच सकारात्मक ऊर्जाही देते. देवी लक्ष्मीला तेसूचे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. तसेच शुक्रवारी पळस वृक्षाची पूजा करून जल अर्पण केल्यासही माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. असे केल्याने शुक्रदेव प्रसन्न होतात, आणि मनुष्याला भौतिक सुख प्राप्त होते.
वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली नसेल, तर त्याने तेसू फुलाचा विशेष उपाय करावा. तेसूचे फूल व नारळ पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे असलेल्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने तुमचे आर्थिक संकट लवकरच दूर होईल. हा एक उपाय केल्याने घरात धनाची कमतरता भासणार नाही. तेसूची ताजी फुले न मिळाल्यास त्याची वाळलेली फुलेही वापरता येतील.
एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल, तर पळसच्या झाडाची एक मुळी पांढर्या सुती कपड्यात बांधून त्याच्या मनगटावर बांधावी. हा उपाय केल्याने आजारी व्यक्तीला आराम मिळतो. तसेच ग्रहांशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. धर्मग्रंथानुसार काही झाडे दैवी शक्तीने परिपूर्ण आहेत. त्यामुळेच हिंदू धर्मात अनेक झाडांना खूप महत्त्व आहे. पळस वृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिदेव वास करीत असल्याच्या मान्यता आहे. त्यामुळे या वृक्षाचे फूल वास्तूशास्त्रानुसार महत्त्वाचे मानले जाते.
टिप्पणी पोस्ट करा