आयएनएस तरकश जहाजाचा ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाबरोबर संयुक्त सराव

 


भारतीय, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेच्या नौदलांमधील सातव्या  IBSAMAR  संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सरावाचे आयोजन  10 ते 12 ऑक्टोबर 2022 दरम्यान  दक्षिण आफ्रिकेतील ग्रीकुरिया (पोर्ट एलिझाबेथ) येथे करण्यात आले होते. या सरावात भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व  फ्रिगेट क्षेपणास्त्र , INS तरकश, चेतक हेलिकॉप्टर आणि मरीन कमांडो फोर्सच्या जवानांनी केले.

सागरी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धिंगत करणे, संयुक्त  लष्करी परिचालन प्रशिक्षणाला चालना देणे,  समान सागरी धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्जता, सागरी क्षेत्रातील दळणवळण दृढ करणे आणि आंतरकार्यक्षमता निर्मिती मजबूत करणे हा या संयुक्त सरावाचा उद्देश होता. सातव्या IBSAMAR VII चा उद्घाटन समारंभ 11 ऑक्टोबर 22 रोजी झाला.  तीन दिवस चाललेल्या या सरावात बंदर आणि समुद्र या दोन्ही स्थानांवरच्या टप्प्यांचा समावेश होता.

बंदरावरील टप्प्यात  10 आणि  11 ऑक्टोबर 22 रोजी  व्यावसायिक देवाणघेवाण, जसे की क्षति नियंत्रण आणि अग्निशमन कवायती, व्हीबीएसएस (VBSS) / क्रॉस बोर्डिंग व्याख्याने आणि सैन्यांमधील परस्परसंवाद यांचा समावेश होता, सागरी सराव टप्पा 12 ऑक्टोबर 22 रोजी झाला. सागरी परिचालनाच्या विस्तृत पैलूंचा  समावेश होता. संक्षिप्त माहितीपर कार्यक्रम  आणि समारोप समारंभ Gqeberha बंदराजवळ भारतीय नौदलाच्या तरकश  जहाजावर आयोजित करण्यात आला होता. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने एका पत्रकात दिली आहे 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने