बारामती ॲग्रो लिमिटेड साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करावा आ. राम शिंदे.

 


बारामती ॲग्रो लिमिटेड, शेटफळगडे  साखर कारखान्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेचे आमदार भाजपा नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त , महाराष्ट्र राज्य यांच्याकडे  एका पत्रा द्वारे केली आहे. संबंधित विषयाबाबत त्यांनी काल श्री .शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांची भेट घेऊन यासंबंधी चर्चा केली व त्यांना पत्र सुपूर्त केले. 

आ. राम शिंदे यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे 'राज्यातील साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू केल्यास संबंधित साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच साखर आयुक्तालयाने जारी केले होते. या आदेशानुसार सन २०२२-२३ या चालू वर्षीच्या गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे. जे कारखाने गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी गाळप सुरू करतील अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीच्या दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या सभेत देण्यात आलेले आहेत.' 

'दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी कारखाना सुरू केल्यास महाराष्ट्र राज्य साखर कारखाने ( क्षेत्र आरक्षण व गाळप आणि ऊस वितरण नियमन ) आदेश , १ ९ ८४ खंड ४ चा भंग होतो . तथापि , बारामती ॲग्रो लिमिटेड , शेटफळगडे , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे या साखर कारखान्याने या वर्षीचा गाळप हंगाम दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ पूर्वी सुरू करून कायद्याचा भंग केलेला आहे. आज सोमवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी या कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती अॅग्रो लिमिटेड , शेटफळगडे , तालुका इंदापूर , जिल्हा पुणे यांच्या कार्यकारी संचालक , जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत' 

बारामती ॲग्रो लिमिटेड, हि कंपनी कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधीत असून या पत्रासंदर्भात साखर आयुक्त काय कारवाई करणार हे बघणे महत्वाचे आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने