चित्ता कृती दलाची स्थापना.

 


मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आणि अन्य उपयुक्त निर्दिष्ट क्षेत्रात सोडण्यात आलेल्या चित्त्यांवर देखरेख ठेवण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कृती दलाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) चित्ता कृती दलाला कामासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देईल  आणि सर्व आवश्यक मदत करेल. हे कृती दल चित्ते ज्या ठिकाणी सोडण्यात आले आहेत त्या  क्षेत्राला जसे आणि जेव्हा ठरवल्याप्रमाणे नियमितपणे भेट देण्यासाठी उपसमिती नियुक्त करू शकते. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

हे कृतीदल चित्त्यांच्या  आरोग्य स्थितीचे  अवलोकन, प्रगती आणि निरीक्षण करणे, चित्त्यांना विलगीकरणात  ठेवणे, त्यांना बाहेरील वातावरणाशी जुळवून घेता यावं यासाठी प्रयत्न करणे, संपूर्ण परिसराची  संरक्षणविषयक स्थिती,  वन आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित  प्रोटोकॉलचे पालन करणे, मध्य प्रदेश वन विभाग आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांना भारतातील चित्त्यांबद्दल  माहिती आणि योग्य सल्ला  देणे , चित्त्यांचे  एकूण आरोग्य, तसेच वर्तन आणि त्यांची देखभाल  या संदर्भात मार्गदर्शन करणे. याशिवाय इतर महत्वाच्या संल्गन गोष्टीवर देखरेख करणे हे काम करेल.  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने