काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांचे भविष्य मतपेटीत बंद

 


काँग्रेस पक्षाच्या  राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मतदान आज पार पडले. या पदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर रिंगणात आहेत. या मतदानात 9,000 हून अधिक प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) प्रतिनिधींनी भाग घेतला. यासाठी सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत AICC मुख्यालयासह देशभरातील पक्षाच्या राज्य कार्यालयांमध्ये मतदान झाले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशभरात ३६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी आलेल्या सोनिया गांधी यांनी आज सांगितले की, आपण या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. सोनिया गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वाड्रा यांनी एकत्र मतदान करण्यासाठी AICC मुख्यालय गाठले. निवडणुकीबाबत पत्रकारांशी संवाद साधताना सोनिया म्हणाल्या की, या दिवसाची मी खूप दिवसांपासून वाट पाहत आहे. यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मतदान केले. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही मतदान केले.

काँग्रेस पक्षात नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे, जो 24 वर्षात प्रथमच गांधी घराण्याच्या बाहेर असेल. सोमवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हे स्पष्ट केले की गांधी घराण्याच्या नेतृत्वाची काँग्रेसला नितांत गरज भासणार असून आगामी काळात तेच पक्षात महत्त्वाची भूमिका बजावेल. निवडलेले पक्षाचे नवे अध्यक्ष सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी यांची जागा घेतील. 1998 पासून सोनियांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरू आहे. 2017 ते 2019 या दोन वर्षांत राहुल गांधी हे  पक्षाचे अध्यक्ष होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने