अखेर काँग्रेसला मिळाले पूर्णवेळ अध्यक्ष

 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे  यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. दिल्लीत आज झालेल्या मतमोजणीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. खर्गे यांच्या विजयाने काँग्रेसमध्ये आता खर्गे राज सुरू झाले आहेत. 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली. आज मतमोजणी झाली. ज्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी  शशी थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात एकूण 9385 मते पडली होती. त्यापैकी 416 मते अवैध ठरविण्यात आली. खर्गे यांना 7897 मतांनी मोठा विजय मिळाला. तर शशी थरूर यांना काँग्रेसच्या 1072 प्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शशी थरूर यांनी आपला पराभव मान्य केला आहे. विजयाबद्दल त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज भरल्याची माहिती आहे. खर्गे आणि थरूर यांच्याशिवाय काँग्रेस नेते केएन त्रिपाठी यांनी झारखंडमधून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, उमेदवारी रद्द झाल्यानंतर खर्गे आणि थरूर यांच्यात थेट लढत झाली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने