शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात सामील होणार ?

 


शिवसेनेत फूट पडल्यानंतर आज मुंबईत शिवसेनेच्या  दोन्ही गटांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावा होत. या मेळाव्या आधी शिंदे गटाचे काही खासदारांनी मोठा दावा केल्याने उद्धव गटातील तणाव वाढला आहे. शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याचा दावा केला गेला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या सहा खासदार आणि १५ आमदार आहेत. त्यामुळे मुंबईतील बीकेसी येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या मेळाव्याला कोणते खासदार आणि आमदार उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिवसेनेने शिंदे गटाचे हे दावे दिशाभूल करणारे असून आमच्या बरोबर असणारे खासदार व आमदार निष्ठावंत असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर-पश्चिम), संजय जाधव (परभणी), ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद), अरविंद सावंत (मुंबई दक्षिण), विनायक राऊत (रत्नागिरी सिंधुदुर्ग), राजन विचारे (ठाणे) हे राहिले आहेत. तर आमदारांमध्ये आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, अजय चौधरी, राजन साळवी यांचा समावेश आहे.

आज मुंबईत दोन दसरा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुक्रमे दादर येथील शिवाजी पार्क आणि बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर स्वतंत्र सभांना संबोधित करणार आहेत. या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दोन्ही गटची ताकद यात दिसणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने