या आद्याक्षराने सुरु होणाऱ्या नावाच्या मुली नशीब घेऊन जन्माला येतात

 


मुलींच्या जन्मानंतर लोक घरात लक्ष्मी आली असे मानतात. ते स्वतःला भाग्यवान समजतात आणि त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला आहे याचे स्वागत करतात. मुलींच्या जन्मानंतर अनेकदा लोक मुलींच्या नावासाठी ज्योतिषाशी संपर्क साधतात याचे कारण असे की बहुतेकजण त्यांच्या मुलींची नावे त्यांच्या जन्मराशी नुसार ठेवु इच्छीतात. असे म्हटले जाते की जन्मराशी नुसार ठेवलेली नावे अधिक प्रभावी असतात. आज आपण अशाच काही अक्षरांच्या नावांबद्दल सांगणार आहोत ज्या जन्मराशीच्या नावाच्या ममुली भाग्यवान असतात. 

K अक्षर: ज्या मुलींचे नाव K  या अक्षराने सुरू होते त्या बुद्धिमान असतात. कामाच्या ठिकाणी त्या स्वतःची ओळख निर्माण करतात. त्या मुली जे काही काम करतात, ते मन लावून करतात आणि त्या कामाचे फळ तिला चांगलेच मिळते. असे मानले जाते की या नावाच्या मुलींमध्ये विनोदबुद्धी देखील चांगली असते. या मुली त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात उच्च पदांवर पोहोचतात. त्या आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. 

L अक्षर: ज्या मुलींचे नाव L ने सुरू होते त्यांच्यावर लक्ष्मीची विशेष कृपा असते असे मानले जाते. त्यांना जे वाटते ते मिळवण्यासाठी त्या कठोर परिश्रम करतात. त्या मुली मेहनती असतात आपले ध्येय साध्य करण्यासाठी या मुली सतत प्रयत्नशील राहतात. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या मुली नेहमीच मार्गस्थ असतात. त्यांना कधीही कशाची कमतरता नसते कारण या अक्षराचे नाव असलेल्या मुली त्यांच्या आयुष्यात प्रत्येक प्रकारे परिपूर्ण असतात.

P अक्षर: ज्या मुलींचे नाव P ने सुरू होते अश्या नावाच्या मुली खूप हट्टी असतात. समाजात वेगळी ओळख निर्माण करणे हा त्यांचा उद्देश असतो. तिचा स्वतःवर इतका विश्वास असतो की तिच्या मते आयुष्यात काहीही मिळवणे अशक्य नाही. त्यांची सर्वात मोठी ताकद ही आहे की त्या कोणत्याही किंमतीत हार मानत नाहीत. या मुली त्यांच्या कारकिर्दीत खूप लवकर उच्च पदांवर पोहोचतात. त्यांच्या जीवनात सुख-सुविधांची कमतरता राहत नाही. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने