काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने, दुकानाला लावली आग.

 


काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते अनंत पटेल यांच्यावर 8 ऑक्टोबर रोजी गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील खेरगाम येथे काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तेथे निदर्शने करत काही दुकानाला आग लावली आणि घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाचीही तोडफोड केली. काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते अनंत पटेल यांनी याबाबत जिल्हा पंचायतीचे प्रमुख यांना अटक करण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले 

ANI या वृत्त संस्थेशी बोलताना ते म्हणाले "मी इथे मीटिंगसाठी येत होतो. त्यानंतर जिल्हा पंचायतीचे प्रमुख आणि त्यांच्या गुंडांनी माझ्या गाडीची तोडफोड केली आणि मला बाहेर नेऊन मारहाण केली. तुम्ही आदिवासी नेता आहात,आम्ही आदिवासी सोडणार नाही, असे ते म्हणाले  आम्ही येथे आम्ही येथे निदर्शने करत बसलो आहोत. जोपर्यंत जिल्हा पंचायत प्रमुख आणि त्यांचे गुंड पकडले जात नाहीत तोपर्यंत आम्ही येथेच धरणे देऊ" 

या घटने बद्दल डीएसपी, नवसारी संजय राय यांनी सांगितले "अनंत पटेल यांच्यावर काल 4-5 जणांनी हल्ला केला होता, त्यानंतर ते त्यांच्या आदिवासी समर्थकांसह धरणे देत आहेत. 3 दिवसात दोषी पकडले जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस तैनात होते मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही" 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने