एलजी साहेबांनी मला जितकी प्रेमपत्रे लिहिली आहेत, तितकी पत्रे माझ्या पत्नीने...

 


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानी  ट्विट केले आहे  'एलजी साहेब माझी रोज जितके रागावतात तितके माझी पत्नी देखील मला रागवत नाही. गेल्या ६ महिन्यांत एलजी साहेबांनी मला जितकी प्रेमपत्रे लिहिली आहेत, तितकी पत्रे माझ्या पत्नीने तिच्या संपूर्ण आयुष्यात मला लिहिली नाहीत.

अरविंद केजरीवाल यांनी पुढे लिहिलेआहे 'एलजी सर, थोडं शांत व्हा आणि तुमच्या सुपर बॉसलाही थोडं शांत व्हायला सांगा.' केजरीवाल सातत्याने आरोप करत आहेत की एलजी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत आणि दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारच्या कामात अडथळा आणत आहेत.

काही दिवसांपूर्वी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी केजरीवाल यांना पत्र लिहिले होते. त्यात केजरीवाल किंवा त्यांच्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्याने गांधी जयंतीनिमित्त राजघाट किंवा विजय घाटाला भेट दिली नसल्याबद्दल नायब राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याला प्रोटोकॉलचे उल्लंघन म्हटले होते. असे कार्यक्रम दिल्ली सरकार आयोजित करतात, असे पत्रात लिहिले आहे. कार्यक्रमाच्या पाहुण्यांना पाठवलेले निमंत्रण पत्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने जाते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याने गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीला भेट न देणे चुकीचे आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने