दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा मालिकेतील शेवटचा सामना आज.

 


आज मंगळवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या T20 सामन्यात रोहित शर्माचा संघ विश्वचषकापूर्वीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. याआधी भारताने मालिकेतील दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी भारताने घेतली आहे, परंतु भारतीय संघाची सर्वात मोठी चिंता म्हणजे गोलंदाजी असुन. गुवाहाटी टी-20 सामन्यात दीपक चहर (4 षटके, 24 धावा) व्यतिरिक्त सर्व गोलंदाज महागडे ठरले आहेत. जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर पडल्याने संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेश राहुल आणि विराट कोहलीला इंदूर T20 साठी विश्रांती देण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात विश्वचषक संघातील अतिरिक्त खेळाडू श्रेयस अय्यरलाही संघामध्ये स्थान मिळू शकते.

दक्षिण आफ्रिकेच्या शीर्ष फळीतील फलंदाजांचा गेलेला फॉर्म  हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. रविवारी आपले दुसरे टी-20 शतक झळकावणारा डेव्हिड मिलर वगळता कोणत्याही फलंदाजीची कामगिरी चांगली झाली नाही. टेम्बा बावुमा आणि रिले रुसो यांनी सलग दुसऱ्या सामन्यात शून्य धावा केल्या, जे दक्षिण आफ्रिकेसाठी चांगले नाही.

गेल्या आठ डावांमध्ये केवळ 68 धावा करणाऱ्या क्विंटन डी कॉकचे अर्धशतक संघासाठी आनंदाची बातमी आहे, तरीही त्यांना धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. रविवारी केशव महाराज वगळता दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी सामान्य होती आणि बावुमा आपल्या गोलंदाजांकडून इंदूरमध्ये चांगल्या शिस्तबद्ध गोलंदाजीची अपेक्षा करेल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने