नव दांपत्याची बेडरूम गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते ?

 


दिवाळी नंतर लग्न सीजन परत सुरु होईल यानंतर नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या हनिमूनच्या (honeymoon) दिवशी बेडरूम फुलांनी सजवली जाईल. प्रेमाचं प्रतीक (symbol of love) असलेले गुलाबाचे फुल या सजावटी साठी सर्वात जास्त प्रमाणात वापरतात. यासोबतच  गुलाबाच्या फुलांना कोमलता आणि सुंदरतेचे प्रतीक आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हनिमूनच्या (honeymoon) दिवशी नव जोडप्याची बेडरूम गुलाबाच्या फुलांनी का सजवली जाते ? चला तर मग आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लग्नसमारंभात (wedding) मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या फुलांचा वापर करून सजावट केलेली असते. इतकंच नाही तर हनिमूनच्या दिवशीही नवरा-नवरीची बेडरुम गुलाबाच्या फुलांनी सजवली जाते. यामागे अनेक कारणे आहेत. विविध रिसर्च रिपोर्ट्सनुसार, वातावरणातील  सुगंधाचा व्यक्तीच्या मूडशी खूप संबंध आहे.  गुलाब हे जगभर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. याशिवायही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे गुलाबाचे फुल हे सजावट करण्यासाठी वापरतात.

काही रिसर्चनुसार, गुलाब जल हे अँटी-डिप्रेसंट मानले जाते. 2011 च्या एका अभ्यासात असे दिसून आले की, गुलाबाच्या पानांमुळे उंदरांची सेंट्रल नर्वस सिस्टम रिलॅक्स होते. यामुळे तणावही कमी होतो. म्हणजेच तुमचा मूड चांगला नसेल, तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल, तर अशावेळी तुम्ही गुलाबाच्या फुलाचा वास  घेऊ शकता. यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल. याशिवाय गुलाबाचा वापरही विविध प्रकारे केला जातो. ब्युटी प्रोडक्ट म्हणून गुलाब जल फार पूर्वीपासून वापरले जात आहे. चंदनाच्या पावडर मध्ये गुलाब जल टाकल्याने त्वचेवरील सनबर्न ठीक होण्यास मदत होते.

आयुर्वेदानुसार गुलाब हे नैसर्गिक कामोत्तेजक आहे. त्याची पाने शरीरातील दोष दूर करतात. यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो. आयुर्वेदामध्ये सहवास जीवन सुधारण्यासाठी गुलाबाची पाने धुऊन खाण्याचा सल्ला दिला जातो. गुलाबाच्या फुलांच्या वासाचा परिणाम सुद्धा तुमच्या मेंदूवर होतो, व त्यामुळे तुमचा मूड सुधारतो.  या फुलाचे इतरही फायदे असून आजही लग्नाची सजावट असेल किंवा हनिमूनसाठी बेडरुम सजवायचे असेल, ही सजावट गुलाबाच्या फुलांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने