जर पॉलिसीमध्ये गडबड आहे, तर कशी कराल विमा कंपन्यांविरुद्ध तक्रार ?

 


अनेकदा विमा पॉलिसींच्या बाबतीत लोक विमा कंपन्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. अनेकवेळा या कंपन्यांच्या एजंटकडून तुमची फसवणूक होते, तर अनेक वेळा तुम्ही कंपन्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही अशा घटना तुमच्या सोबत घडल्यास काय करावे. या प्रकारची घटना जर तुमच्या सोबत घडली ठार तुम्ही विमा कंपन्यांविरुद्ध तक्रार नोंदवा. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ग्राहकांसाठी ही तरतूद केली आहे. चला तर मग आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल माहिती देत आहोत.

विमा कंपनीकडे तक्रार कशी करावी : तुमची तक्रार नोंदवण्यासाठी प्रथम तुम्हाला विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याला भेटावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार द्यावी लागेल. त्यानंतर अधिकारी निश्चित वेळेत तुमची समस्या दूर करण्याचे आश्वासन देतील. दिलेल्या वेळेत समस्येचे निराकरण न झाल्यास तुम्ही आयआरडीए (IRDA) बरोबर संपर्क साधू शकता.

IRDA मध्ये तक्रार कशी करावी : IRDA तक्रार करण्यासाठी, तुम्ही IRDA च्या टोल फ्री क्रमांक 155255 वर संपर्क करून तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही complaints@irdai.gov.in वर तुमच्या ई-मेलद्वारे तक्रार पाठवू शकता. किंवा तुम्ही IRDA च्या वेबसाइटवर IGMS वर देखील तक्रार करू शकता. याशिवाय, तुम्ही पत्राच्या माध्यमातून IRDA कडे तक्रार पाठवू शकता. तुम्ही विमा कंपनीविरुद्ध IRDA, गची बाओली, हैदराबाद 500032 येथे तक्रार पाठवू शकता.

प्रक्रिया काय असते : तुम्ही तक्रार केल्यानंतर तुम्हला टोकन क्रमांक दिला जातो. यानंतर ही तक्रार विमा कंपनीकडे या प्रकरणाची तपसणी करण्यासाठी व त्यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्यासाठी पाठवली जाते. कंपनीचा प्रतिसाद समाधानकारक नसल्यास, तक्रार विमा लोकपाल किंवा ग्राहक मंच किंवा दिवाणी न्यायालयाकडे पाठविली जाते.

कंपनीच्या उत्तराने समाधान झाले नाही तर : ग्राहकांनी विमा कंपन्यांविरुद्ध IRDA कडे केलेल्या तक्रारी. त्याचे निराकरण करण्यासाठी कंपनीला ठराविक मुदत दिली जाते. त्यानंतर जर ग्राहक कंपनीच्या उत्तराने समाधानी नसेल तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने