'बकरी ईद मे बचेंगे तो मोहरम मे ....।' मल्लिकार्जून खर्गे याचं विधान, भाजपची टीका

 


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उमेदवार असणारे मल्लिकार्जून खर्गे  यांच्या  मध्य प्रदेश येथे केलेल्या एका विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. एका पत्रकार परिषदेत खर्गे यांना '२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून तुम्ही राहुल गांधींविरोधात उभे राहणार का?' असं विचारलं गेले असता त्यांनी यावर सध्या भाष्य करणं फार घाईचं होईल असं स्पष्ट सांगितलं. 

याबाबत बोलताना ते म्हणाले “आधी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडू देत. 'बकरी ईद मे बचेंगे तो मोहरम मे नाचेंगे।' अशी एक म्हण आहे. आधी आमचं मतदान होऊ देत, मला अध्यक्ष होऊ द्या, त्यानंतर आपण यासंबंधी बोलू”. २० वर्षांनंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होणार आहे.

परंतु मल्लिकार्जून खर्गे  यांनी ‘मोहरम’चा उल्लेख करत केलेल्या विधानावर भाजपाने टीका केली आहे. ‘मोहरम’ची खिल्ली उडवण्यात आल्याने भाजपाने संताप व्यक्त केला आहे. “मोहरम हा उत्सव नसून शोक आहे. हा मुस्लिमांचा मोठा अपमान आहे,” असं भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी ट्विटरवर  म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने