सरकारमध्ये अस्वस्थता नाही अजित पवार स्वत: अस्वस्थ, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

 


विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी नुकतेच सरकारमध्ये अस्वस्थता असल्याचे विधान केले होते, याबाबत पत्रकारांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले 'अजितदादा स्वत: अस्वस्थ असल्यामुळे ते असे बोलतायत, आमच्याकडे कुठलीही अस्वस्थता नाही, आम्ही सरकार पुर्णकाळ चालवू, पुन्हा एकदा निवडून येऊ महाराष्ट्रामध्ये आता एक अतिशय स्थिर सरकार आलेले आहे, गतिशील सरकार आलेले आहे आणि काम करणारे सरकार आलेले आहे" उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रा. जी. एन. साईबाबा व इतरांची निर्दोष मुक्तता करण्याच्या  उच्च न्यायालयाचा आदेशाला सर्वोच्च न्यायालया स्थगिती दिली  याचे स्वागत केले . ते म्हणाले 'मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काल दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगित केला, नक्षलवाद्यांना राष्ट्रविघातक कार्यात मदत केल्याचा आरोप असलेल्या प्रा. जी. एन. साईबाबाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निकालामुळे शहीदांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून, या निर्णयाचे मी स्वागत करतो, सर्वोच्च न्यायालयाने कालच खंडपीठ गठीत करुन आज त्यावर तातडीने सुनावणी घेतली, याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहे. जे पोलिस आणि जवान नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झाले, त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा आजचा हा निकाल आहे.' 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने