पती-पत्नीमधील नाते टिकवण्यासाठी रामायणातील या कथा लक्षात ठेवा

 


पती-पत्नीमधील नाते परस्पर सौहार्द, आदर, विश्वास आणि प्रेम यावर आधारित आहे. कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी पती-पत्नीने एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर असले पाहिजे. घरात जे काम पत्नी करते त्या कामात पतीने सहाय्य केले तर पती-पत्नीमधील प्रेम कायम राहील.पती-पत्नी आपापल्या गरजेनुसार कामाची विभागणी करतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिला कामात मदत करायची नाही, मी पुरुष आहे, त्यामुळे मी हे का करू?, असा अहंभाव बाळगणे ठीक नाही. पती-पत्नीने आपल्या सहजीवनात आनंद फुलवण्यासाठी नेहमी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे.

याबतीत रामायणात एक कथा आहे. रामायणात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचा वनवास काळ चालू होता. देवी सीता रोज सकाळी वनातून सुंदर फुले तोडून श्रीरामाला अर्पण करत असे. एके दिवशी जंगलातील फुले तोडून त्यापासून दागिने बनवले आणि देवी सीतेला घातले. हे पाहून देवी सीतेला आनंद झाला आणि आश्चर्य वाटले. देवीने श्रीरामाला विचारले आज तुम्ही माझे काम का करत आहेस? यावर श्रीरामांनी उत्तर दिले की 'आपल्या सहजीवनात आपण दोघेही सारखेच महत्वाचे आहोत, कोणी छोटे मोठे नाही.' 

जीवनात पत्नीच्या सल्ल्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका याबाबतीत रामायणात एक समर्पक कथा आहे, सीतेच्या अपहरणा नंतर श्रीराम संपूर्ण वानरसेनेसह लंकेला पोहोचले होते. जेव्हा मंदोदरीला हे कळले तेव्हा तिला समजले की आता लंकेचे भविष्य धोक्यात आहे. मंदोदरी ताबडतोब रावणाकडे पोहोचली आणि म्हणाली की तूम्ही सीतेला लगेच रामाकडे सुखरूप परत करा. राम हा काही सामान्य माणूस नाही. त्यांच्याशी वैर करू नका.

मंदोदरी हे अतिशय व्याकुळपणे रावणाला सांगत होती, पण रावणाने मंदोदरीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले, आणि तिचा अपमान केला व तेथून निघून गेला. रावणाच्या जाण्यानंतर, मंदोदरीला लक्षात आले की  रावणाचा अहंकार हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. तिने रावणाला याबाबतीत सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु रावणाने मंदोदरीचा सल्ला ऐकला नाही, सतत तिचा अपमानही केला. काहीच दिवसात श्रीरामाच्या हातून रावणाचा वध झाला आणि रावणाच्या संपूर्ण वंशाचा नाश देखील झाला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने