भारत आणि साऊथ आफ्रिका निर्णायक सामन्यात आज एकमेकांशी भिडणार.

 


भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिका आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आज दोन्ही संघ निर्णायक सामन्यात एकमेकांशी भिडतील. रांची वनडे सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी करणाऱ्या टीम इंडियाकडे मालिका काबीज करण्याची अतुलनीय संधी आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी विशेषत: श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहता भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीचा फॉर्म चिंतेचा विषय ठरत असून, ज्यावर शिखर धवन आणि शुभमन गिल या सामन्यात मात करू शकतील अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगली फलंदाजी करत असला तरी संघाची सुरुवात चांगली होत नाही. आधीच टी-20 मालिका गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हा सामना जिंकून चांगल्या ऊर्जेने विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथे जायचे आहे. एकंदरीत, आजचा हा निर्णायक सामना रोमांचक ठरण्याची अपेक्षा आहे  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा तिसरा एकदिवसीय सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आज मंगळवार, 11 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने