युक्रेनमध्ये राहत असलेल्या भारतीयांना मायदेशी परतण्याची दूतावासाकडून विनंती

 


ब्युरो टीम: युक्रेन व रशियाशी यांच्याशी संघर्ष वाढत असून युक्रेनमधील भारतीय दूतावासाने (The Indian embassy in Ukraine) युक्रेन देशात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक नवीन अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत लोकांना सध्या युक्रेनमध्ये येऊ नये असे स्पष्ट केले आहे आणि युक्रेनमध्ये सध्या राहत असलेल्या भारतीयांना देश सोडून मायदेशी परतण्याची विनंती करण्यात आली आहे (India advises its citizens to leave Ukraine at earliest as conflict escalates).

“आम्ही युक्रेनमधील विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला देत आहोत” असे दूतावासाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझ्झिया या चार क्षेत्रांमध्ये मार्शल लॉ (martial law) लागू केल्‍याच्‍या  घोषणेनंतर काही तासांच्या आत हि अधिसूचना जरी केली गेली आहे. 

डोनेस्तक (Donetsk), लुहान्स्क(Luhansk), खेरसन(Kherson) आणि झापोरिझ्झिया(Zaporizhzhia) या चार क्षेत्रांमध्ये रशिया-समर्थित स्थानिक प्रशासनाने नियंत्रण घेतल्यापासून अनेक तणाव अनुभवले आहेत. नवीन आदेशानुसार, पुतिन यांनी चार क्षेत्रांतील सर्व प्रमुख अधिकार्यांना विशेष अधिकार दिले आहेत, आता या प्रदेशांमधील कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी या प्रशासनाची असेल. याचाच अर्थ असा आहे की स्थानिक प्रशासनांना कर्फ्यू लागू करण्याचा आणि नजीकच्या भविष्यासाठी कोणत्याही सार्वजनिक मेळाव्यावर बंदी घालण्याचा अधिकार असेल.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले. "हे सर्व प्रदेश रशियन फेडरेशनचे अविभाज्य भाग आहेत आणि ते सर्व संरक्षित आहेत. त्यांची सुरक्षा रशियाच्या उर्वरित भूभागाप्रमाणेच राखण्यात येईल." यापूर्वी मध्य कीवमध्ये अनेक मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले,  सोमवारच्या रशियन हल्ल्यानंतर किमान दोन स्फोट झाले रशियाने इराणी बनावटीचे ड्रोन वापरून कीव येथील एनर्जी इन्फ्रास्टचर उध्वस्त केले यात पाचजण ठार झाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने