अभिनेते मुकेश खन्ना यांनी 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या टीझरबद्दल व्यक्त केली नाराजी.

 


प्रभासच्या मोस्ट अवेटेड 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. चित्रपटातील रावणाचा लूक पाहून लोक हैराण झाले आहेत. यासोबतच हा बिग बजेट चित्रपट असूनही चित्रपटाच्या व्हीएफएक्सने लोकांची निराशा केली आहे.अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील टीझरबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि चित्रपटाच्या कलाकारांपासून ते निर्मात्यां पर्यंतच्या संपूर्ण वादावर त्यांनी निशाणा साधला आहे.  मुकेश खन्ना व्हिडिओ मध्ये म्हणतात की, 'जेव्हा आपण रामायणाबद्दल बोलतो, त्याचा अर्थ असा होतो की आपल्याला रामायणाचा फायदा घ्यायचा आहे. आमच्या धर्माची खिल्ली उडवणारे तुम्ही कोण? तुमच्या धर्माबद्दल काही सांगा. हिम्मत आहे का?' चित्रपटांच्या बहिष्काराशी त्याचा संबंध जोडताना मुकेश खन्ना म्हणतात, 'ज्या वेळी चित्रपटांवर ठिकठिकाणी बहिष्कार टाकला जात आहे, अशा वेळी तुम्ही पुन्हा बोटे दाखवत असाल तर लोक हात धरतील., तुम्ही धर्माची चेष्टा करता आहात असे दिसते, ना राम, राम दिसतो. ना हनुमान हनुमानासारखा दिसतोय. रावण, रावण नाही दिसत. मग याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणाल. असे तुम्ही तुमच्या धर्माबाबत करून दाखवा.'

मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील पात्रांचा लूक बद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत याबाबत  ते म्हणाले की, 'प्रत्येक देवाचे एक रूप असते जे लोकांच्या मनात कैद असते. जर तुम्ही त्यात बदल केला तर तुम्ही चित्रपटावर 400-500 किंवा 900-1000 कोटी रुपये जरी गुंतवले तरी तुमचा चित्रपट चालणार नाही कारण तुम्ही त्यांच्या विश्वासाचा फायदा घेत आहात.यामुळेच आजकाल चित्रपट न बघताही चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातो'

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने