आयटी कर्मचार्‍यांना कार्यालयात काम करण्यास सांगितले, तर ते फ्लैक्सिबल नोकरी शोधू लागले

 


कोरोना संक्रमणाच्या काळात  घरून काम करण्याची सवय जडलेल्या आयटी कंपन्यांचे कर्मचारी आता कार्यालयात जाणे टाळत आहेत. आयटी सेवा कंपन्यांचे बरेच कर्मचारी आता लवचिक नोकरीच्या संधी शोधत आहेत. देशात काम करणाऱ्या आयटी कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परतण्यास सांगत असुन  बरेचसे आयटी कंपन्यांचे कर्मचारी कार्यालयातून काम करण्यास उत्सुक नाहीत त्यांना आता कार्यालयातून काम करणे जड होत आहे.

सुमारे 88 टक्के कर्मचारी सध्याच्या नोकऱ्या सोडून फ्लैक्सिबल नोकरी शोधत आहेत. रोजगार देणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की आयटी कंपन्यांचे कर्मचारी आता नियमित नोकऱ्यांच्या तुलनेत फ्लैक्सिबल नोकरीच्या ऑफर शोधत आहेत. बंगलोर स्थित CIEL HR सर्व्हिसेसच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की महत्वाच्या  आयटी कंपन्यांमधील 88% कर्मचारी त्यांच्या सध्याच्या नोकऱ्या सोडू इच्छितात. यापैकी 46% कर्मचारी ह्या वर्किंग मदर आहेत. त्यांना घरातून कामाची संधी हवी आहे कारण सध्याची कंपनी त्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगत आहे.

तसेच 46 टक्के आयटी कर्मचारी चांगल्या पगारासाठी त्यांची सध्याची कंपनी सोडण्यास इच्छुक आहेत. याशिवाय, उर्वरित 8 टक्के कर्मचार्‍यांना नोकरी बदलायची आहे कारण ते लोक यापुढे त्यांचे छंद आणि त्यांची आवड यासाठी वेळ देऊ शकत नाहीत कारण त्यांना ऑफिसमध्ये जाण्यायेण्या साठी जास्त वेळ लागतो.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कार्यालयात परतल्यामुळे आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे स्वातंत्र्य धोक्यात आले असे वाटू लागले आहे, तसेच त्यांना त्यांच्या  जीवनशैलीशी तडजोड करावी लागत आहे.  हे सर्वेक्षण 19 आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 1000 आयटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले आहे. नोकरदार कंपन्यांच्या तज्ञांचे म्हणणे आहे की ऑफिस कॉलमुळे राजीनामा देण्याचा धोका अद्याप मोठा नाही कारण सध्याच्या जॉब मार्केटमध्ये नोकऱ्या कमी उपलब्द आहेत आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नोकरी मिळण्यात अडचण येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने