आचार्य चाणक्यांची नीती (Chanakya Niti) माणसाला आजच्या युगातही योग्य मार्गाने जीवनातील आव्हानांशी सामना करायला शिकवतात. त्याचबरोबर चाणक्य नीती शास्त्रामध्ये व्यक्तीच्या गुण-दोषांबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार, मनुष्याची काही वैशिष्ट्ये हि त्याची कपटी प्रवृत्ती दर्शवतात.
चाणक्य नीतीनुसार, सद्गुणी, हुशार आणि ज्ञानी व्यक्तीचा सहवास तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचा असतो, परंतु जर तुम्ही स्वार्थी आणि कपटी व्यक्तीच्या सहवासात असाल तर तो तुम्हाला अडचणीत आणू शकतो. अशा परिस्थितीत चाणक्य नीति आपल्या आजूबाजूच्या लोकांना ओळखण्यासाठी शिकवते. चला तर मग जाणून घेऊया, आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणकोणत्या लक्षणांवरून फसवणूक करणारा व्यक्ती आपण ओळखू शकतो.
चाणक्य नीतीनुसार जे लोक बोलताना गोष्टी गोल फिरवून सांगतात, त्यांच्या मनात अनेकदा वाईट भाव असल्याचे दिसून येते. अशी माणसे समोर काहीतरी बोलतात आणि पाठीमागे वेगळे बोलतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. कारण जे आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सरळ आणि स्पष्टपणे सांगतात ते कधीही कोणाला फसवू शकत नाहीत. म्हणजेच अशा लोकांचे हृदय स्वच्छ असते. अशा व्यक्तीला कधीही आपल्या मित्राचे नुकसान करत नाहीत.
आचार्य चाणक्य सांगतात की, फसवणूक करणारा माणूस गरजेच्या वेळी तुमच्याकडून पैसे घेतो, पण जेव्हा ते परत करण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते टाळण्यासाठी त्याच्याकडे अनेक सबबीही असतात. असे लोक तुम्हाला टाळून तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यामुळे अशा लोकांचा हेतू आणि स्वभाव ओळखून त्यांच्यापासून लवकरात लवकर सुटका करणे हेच ठीक आहे कारण हे लोक तुमची केव्हाही फसवणूक करू शकतात आणि त्यांच्यामुळे तुम्ही स्वतः अडचणीत येऊ शकता.
तुमच्या कामाच्या दरम्यान जर कोणी तुम्हाला मदत करण्यास नकार देत असेल तर समजून घ्या की हे लोक तुमचे हितचिंतक कधीच होऊ शकत नाहीत. अडचणीच्या वेळी या गोष्टींचा तुम्हाला कधीच उपयोग होणार नाही. असे स्वार्थी आणि फसवे लोक फक्त स्वतःच्या भल्याचाच विचार करतात. त्यामुळे या लोकांना आपल्या पासून दूर ठेवण्यातच शहाणपणा आहे.
टिप्पणी पोस्ट करा