विविध संस्कृतींमध्ये लग्नानंतरची पहिल्या रात्रीच्या (First night after marriage) वेगवेगळ्या प्रथा आहेत. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये या रात्रीला जेवढे रोमँटिक दाखवत असतात तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही. अनेकदा या रात्री जोडपे एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवतात. लग्नाच्या पहिल्या रात्रीशी संबंधित वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या समजुती असून भारतीय संस्कृतीत अनेक ठिकाणी पती-पत्नीला लग्नानंतर सुरुवातीचा काही काळ एकत्र झोपू दिले जात नाही. पण सर्वात विचित्र प्रथा आफ्रिकेच्या काही भागात आढळते जिथे या खास रात्री वधूची आई (Mother) तिच्यासोबत झोपते.
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबांचा मिलाप. लग्नात दोन कुटुंब एकत्र येतात. कुठल्याही मुलीच्या जीवनातील सर्वात सुंदर प्रसंग विवाहसोहळा (Wedding) असतो. कारण ह्या प्रसंगानंतर मुलींचे जीवन पूर्णपणे बदलते. लग्नानंतरची पहिली रात्र तर नवविवाहित जोडप्यांसाठी (Couple) खूप खास असते. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, आफ्रिकेच्या (African Tribes) काही प्रातांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीची वेगळीच प्रथा आहे. येथे नवविवाहित जोडप्यासोबत लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आई देखील झोपते.
लग्न झाल्यानंतर जेव्हा पती-पत्नी यांची पहिली रात्र असते, तेव्हा त्या रात्री वधूची आईही त्यांच्यासोबत असते. म्हणजेच लग्नाच्या पहिल्या रात्री वधूची आईही नवविवाहित जोडप्यासोबत त्यांच्या खोलीत झोपते. जर संबंधित वधूची आई नसेल, तर कुटुंबातील सर्वात वयस्कर स्त्री तिच्यासोबत झोपते. यावेळी वृद्ध स्त्री त्या रात्री वधू आणि वरांना सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र दिते, आणि वधूला त्या रात्री काय करावे, हे समजावून सांगते. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबातील इतरांना नवविवाहित जोडप्याने लग्नाची सुरुवात चांगली केली आहे, असेही ती सांगते.
आफ्रिकेतील अनेक देश आजही त्यांच्या जुन्या प्रथांचे पालन करतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या चालीरीती, प्रथा, परंपरा पाळणाऱ्या बहुतेक जमाती तिथे राहतात. यापैकी अनेकजण आजही या चालीरीती, परंपरा पाळतात. अशीच एक परंपरा आफ्रिकेतील काही गावांमध्ये आढळते, जी लग्नाशी संबंधित आहे केवळ आफ्रिकेतच नाही, तर जगात अनेक ठिकाणी लग्नाशी संबंधित अशा प्रथा आहेत, ज्या विचित्र वाटतात. अशीच एक प्रथा क्युबामध्ये आहे, जिथे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना वधूसोबत नाचण्यासाठी पैसे द्यावे लागतात. तर, स्कॉटलंडच्या अनेक भागात लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी वधू-वरांवर चिखलफेक केली जाते.
टिप्पणी पोस्ट करा