अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत चर्चा

 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये त्यांनी अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. वित्त मंत्री सीतारामन IMF, जागतिक बँक, G20 आणि सेंट्रल बँक गव्हर्नर (FMCBG) च्या वार्षिक बैठकांना उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जगभरातील अनेक देशांच्या अर्थमंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. त्यांनी OECD, युरोपियन कमिशन आणि UNDP चे नेते आणि प्रमुख यांच्या बरोबर देखील बैठका घेतल्या. IMF आणि जागतिक बँकेच्या बैठकींच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी मंगळवारी इजिप्त, भूतान, नेदरलँड, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरियाच्या मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी OECDचे सरचिटणीस मॅथियास कोरमन आणि FATF चे अध्यक्ष राजा कुमार यांचीही भेट घेतली.

OECD सरचिटणीस यांच्याशी चर्चा करताना, अर्थमंत्र्यांनी 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी OECD बरोबर द्विपक्षीय सहकार्य आणि समर्थन यावर चर्चा केली. इजिप्तच्या आंतरराष्ट्रीय सहकार मंत्री रानिया अल मशात यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकीत सीतारामन यांनी दोन्ही देशांमधील अक्षय उर्जेवर विचार विनिमय केला. सीतारामन यांनी नेदरलँड्सचे अर्थमंत्री सिग्रिड काग यांची भेट घेतली, त्यादरम्यान त्यांनी सांगितले की भारत नेदरलँड बरोबर G20 मध्ये सामील होण्यास उत्सुक आहे. सीतारामन यांनी G20 शी संबंधित जागतिक सार्वजनिक वस्तू, कर्ज आणि हवामाना अश्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सौदी अरेबियाचे अर्थ राज्यमंत्री मोहम्मद अल जदान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भारत-सौदी द्विपक्षीय सहकार्याच्या मुद्द्यांवर तसेच आर्थिक मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, दक्षिण कोरियाचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री चू क्युंग-हो यांच्यासमवेतच्या बैठकीत, सीतारामन यांनी पुढील वर्षी भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी दक्षिण कोरियाचा पाठिंबा मागितला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने