क्रिमिया आणि रशिया यांना जोडणाऱ्या एकमेव ब्रिज वर ट्रकचा स्फोट, तीन ठार.

 


क्रिमिया आणि रशिया यांना जोडणाऱ्या एकमेव पुलावर एक स्फोट झाला यात पुलाचे नुकसान झाले असून, क्रिमियन ब्रिजवरच्या  स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला, असे रशियन तपास समितीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे. जरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि "प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत तीन जण ठार झाले, पुलावर स्फोट झालेल्या ट्रक मधील प्रवासी. तसेच एका महिलेचे आणि एका पुरुषाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत, त्यांची ओळख पटवली जात आहे, " 

क्रिमियन ब्रिजवर शनिवारी सकाळी ट्रकचा स्फोट झाला, ज्यामुळे रेल्वे ट्रेनच्या अनेक इंधन टाक्यांना आग लागली. रोड ब्रिजचे दोन स्पॅन कोसळले परंतु क्रिमियापासून क्रास्नोडार प्रदेशाकडे जाणारी लेन तशीच राहिली. पुलावरील रस्ता आणि रेल्वेच्या काही भागावरील वाहतूक ठप्प झाली होती. रशियन सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन केला. ताज्या माहिती नुसार पुलावरच्या काही भागाची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने