शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारच्या वैधतेला आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. यात राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांचा समावेश होता. आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे मंगळवारी या केसची पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचा या घटनापीठात समावेश आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची पात्रता, मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदावरून झालेल्या हकालपट्टीला दिलेले आव्हान. प्रभू यांनी भरत गोगावले यांच्या मुख्य प्रतोदपदी केलेल्या नियुक्तीला केलेला विरोध. अश्या विविध मुद्दय़ांवरील पाच-सहा याचिकांवर घटनापीठापुढे आज मंगळवारी सुनावणी होणार आहे. या दृष्टीने मंगळवारच्या सुनावणीत विचारविनिमय व युक्तिवाद होण्याची अपेक्षा आहे. या सर्व मुद्दय़ांवर घटनापीठ कोणता निर्णय देणार, याकडे राजकीय नेत्यांबरोबरच राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. घटनापीठाच्या निकालावर महाराष्ट्र सरकारचे भविष्य अवलंबून आहे
टिप्पणी पोस्ट करा