बहुचर्चित अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज अखेर कोणी केले अर्ज दाखल ? वाचा




 ब्युरो टीम : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 - अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाकरिता श्री. राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), श्री. मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि श्रीमती नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपली नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहेत.
दरम्यान, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी  ऋतुजा लटके यांना मिळाली आहे. मात्र, त्यांचा नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला नव्हता. लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा मोठा दिलासा मानला जातोय. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र लटके यांना उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला देतानाचा पालिकेला चागलंच सुनावलं आहे.
सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्यावतीने करण्यात आला होता. तर राजीनाम्याची योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने केला होता. अखेर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत, असं सांगितलं आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने