स्कॉटलंडची टी-२० विश्वचषकात दमदार एन्ट्री वेस्टइंडिचा केला पराभव

 


माजी चॅम्पियन वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवून स्कॉटलंडने टी-२० विश्वचषकात आपली दमदार एन्ट्री मारली आहे (West Indies vs. Scotland). ऑस्ट्रेलियात रविवार 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या T20 विश्वचषक 2022 मध्ये आज पण धक्कादायक निकालची नोंद झाली. आज झालेल्या सामन्यात स्कॉटलंडने माजी विजेत्या वेस्ट इंडिजचा 42 धावांनी पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉटलंडच्या संघाने शानदार फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 160 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला 161 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 18.3 षटकांत 118 धावा करून सर्वबाद झाला.

स्कॉटलंडकडून सलामीला आलेल्या जॉर्ज मुनसेने शानदार फलंदाजी करताना 53 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 66 धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यात मदत झाली. स्कॉटलंडची फलंदाजीच नाही तर गोलंदाजीही उत्कृष्ट होती. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकेही टिकू शकला नाही. मार्क वॉटने 4 षटकात 12 धावा देत 3 बळी घेत संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने