महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळय़ाप्रकरणी तपास सुरु राहणार

 


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळय़ाप्रकरणी तपास सुरु राहणार असून याही माहिती काळ न्यालयात देण्यात आली. या प्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे घोटाळय़ाशी संबंधित उपस्थित केलेले मुद्दे आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याची माहिती आर्थिक गुन्हे विभागातर्फे शनिवारी (EOW) विशेष न्यायालयात देण्यात आली.

यापूर्वी विशेष म्हणजे यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे सापडले नसल्याचे सांगून प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल EOW ने न्यायालयात सादर केला होता. मात्र या अहवालाला विरोध करणारी मूळ तक्रारदाराने केलेली निषेध याचिका आणि ईडीच्या अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास परत सुरू करण्यात आला असल्याचे EOW ने सांगितले.

मूळ तक्रारदार सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेतील मुद्दे योग्य ठरवून उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश EOW ला दिले होते. मात्र आरोपींविरूद्द ठोस पुरावे सापडले नसल्याचा दावा करून पोलिसांनी प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. या अहवालाविरोधात अरोरा यांनी न्यायालयात निषेध याचिका करून त्यांचे म्हणणे ऐकण्याची मागणी केली होती. तर ईडीनेही अहवाल सादर करून या प्रकरणी पुरावे असल्याचा दावा केला होता. या प्रकरणात महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार हे देखील एक आरोपी आहेत 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने