पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी (12 ऑक्टोबर 2022) रोजी पुणे येथील अधिकार्यांच्या पथकाने एका कारवाई दरम्यान खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले असून. त्याच्याकडून प्रत्येकी 500/- रुपये मूल्य असलेल्या एकूण 400 भारतीय बनावट चलनी नोटा, ज्याचे दर्शनी मूल्य 2 लाख रुपये आहे, त्या सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार जप्त करण्यात आल्या. हि कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे येथील प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली या जप्त करण्यात आलेल्या बनावट भारतीय चलनी नोटा प्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंदवन्यात आला आहे.
तसेच, तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा पुरवठ्यात सहभागी असलेल्या आणखी दोघांनाही डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून. या बनावट नोटा बांगलादेशातून भारतात आणण्यात आल्या असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, पुढील तपास चालू आहे. अशी माहिती अर्थ मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
टिप्पणी पोस्ट करा