WHO च्या सर्वे नुसार जगातील 2 अब्ज लोक लठ्ठपणा या विकाराने ग्रस्त आहेत, वर्षभरात जगातील 17 दशलक्ष मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा आहे असे निरीक्षण संशोधनात नोंदविले आहे. हि समस्या केवळ श्रीमंत राष्ट्रांपुरती मर्यादित नसून गरीब, विकसनशील देशातहि आहे. एका रिपोर्ट नुसार युनायटेड स्टेट्स, तुर्की, न्यूकॅसल, दक्षिण आफ्रिका, बार्बाडोस, मेक्सिको, माल्टा आणि आशियाई देशात तीसपेक्षा जास्त वयोगटातील चाळीस टक्के पेक्षा जास्त महिलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे हि समस्या पुरुषांमध्ये देखील कमी अधिक प्रमाणात आढळते.
जर तुम्हला जास्त वजनाची समस्या भेडसावत असेल तर तुम्ही एकही रुपया खर्च न करता जीवनात छोट्या गोष्टी पाळून ते नियंत्रित करू शकता. सोपे असे वजन कमी करण्याचे प्रोग्राम वापरून पाहण्यात तुमचे काहीच नुकसान होणार नाही. वजन कमी करण्यासाठी शिस्तबद्द दिनचर्या ठेवावी लागेल तसेच यात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर खूप विश्वास, कठोर परिश्रम आणि इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
वजन कमी करण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला चरबी-बर्नर म्हणतात. तुम्ही तुमच्या शरीराची जास्त हालचाल करून हे साध्य करू शकता. जसे कि रोज लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करणे, कुठे खरेदीला जायचे असेल तर तुम्ही तुमचे वाहन थोडे दूर पार्क करू शकता आणि दुकानाच्या दिशेने थोडे चालत जाऊ शकता. तुम्ही रोज कंटाळवाणे मोठे व्यायाम करण्याऐवजी लहान व्यायामाने सुरुवात करू शकता. व्यायामामुळे तुमची चरबी नैसर्गिकरित्या कमी होते. जशी चरबीची पातळी कमी होते तशी तुमची व्यायामाची क्षमता देखील वाढते. तसेच हळूहळू वाढलेली क्षमता तुम्हाला व्यायामावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात मदत करते व्यायामाचे संपूर्ण शरीराला होणारे फायदे आतून-बाहेर दिसतात. व्यायाम तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवतो, तुम्ही दररोज व्यायामाचा कार्यक्रम सुरू करून त्याची वेळ हळूहळू वाढवू शकता.
वजन कमी करण्याची एक महत्त्वाची नैसर्गिक पद्धत म्हणजे तुम्ही आरोग्यदायी पदार्थ खात आहात हे सुनिश्चित करणे.रोजच्या आहारात फास्ट फूड, जंक फूड समाविष्ट नसावेत कारण हे पदार्थ जास्त चरबी निर्माण करतात आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला चरबी बर्न (जाळायची) करायची आहे. अन्नाचे योग्य सेवन देखील चरबी बर्न मदत करेल. तुमच्या आहारात फळे आणि भाज्या, पातळ प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ह्या पदार्थांचा समावेश करू शकता, तसेच माशांमध्ये प्रथिने जास्त असतात. चिकन देखील चांगले प्रथिन स्त्रोत आहेत पण त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. आपल्या सामान्य दैनंदिन आहारात या पदार्थांचा समावेश करा व शिस्तबद्द दिनचर्या ठेऊन वजन कमी करा.
टिप्पणी पोस्ट करा