पक्ष्याच्या चिन्हा संदर्भात निवडणूक आयोगाचे उद्धव ठाकरे यांना पत्र..

 


निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Assembly Bypoll in Andheri ) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर एकनाथ शिंदे गटाने केलेल्या दाव्यावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना उद्या शनिवार 2 वाजेपर्यंत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत 'धनुष्यबाण' चिन्ह वाटपाची मागणी करणारे निवेदन शिंदे गटाने सादर केले तेव्हा निवडणूक आयोगाने हे निर्देश दिले. 

निवडणूक आयोगाने यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आवश्यक कागदपत्रांसह 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बाजू मांडण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आधीच परवानगी दिलेली आहे. शिंदे यांनी आपला गट हा मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून 'धनुष्य-बाण' हे निवडणूक चिन्ह देण्याची मागणी आयोगाकडे केली आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान या संदर्भातील इतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत निवडणूक आयोगातील सुनावणीला स्थगिती द्यावी, ही उद्धव गटाची मागणी मान्य केली नाही. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने उद्धव ठाकरे गटाच्या अर्जावर दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर हा आदेश दिला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने