निवडणूक आयोगाची निवडणूक रॅलींमध्ये साड्या आणि शर्ट वाटपावर बंदी

 


निवडणूक आयोगाने निवडणूक रॅलींमध्ये भेटवस्तू म्हणून साड्या आणि शर्ट वाटपावर बंदी घातली आहे. तसेच शासकीय व निमसरकारी शैक्षणिक संस्थांच्या मैदानांचा रॅलीसाठी वापर करू नये, असेही बजावले आहे. शिवाय निवडणुकीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना जाहिरातींसाठी समान जागा देण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.

निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कोणताही पक्ष किंवा पक्षाचे उमेदवार रॅली आणि पदयात्रेत पक्षाने दिलेले कॅप, मास्क, स्कार्फ इत्यादी वापरू शकतात. पक्ष किंवा उमेदवाराने तयार केलेले हे प्रचार साहित्य वापरण्यास मनाई असणार नाही. मात्र मेळाव्यात पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या वतीने साड्या आणि शर्टचे वाटप करणे यास बंदी असेल.

सार्वजनिक ठिकाणी जाहिरातींसाठी सर्व पक्षांना समान जागा देण्यात यावी, असेही आयोगाने म्हटले आहे. परंतु खाजगी ठिकाणी भिंतींवर लिहिणे, पोस्टर लावणे यासारखे निर्बंध स्थानिक कायद्यानुसार पाळले पाहिजेत असे निर्देश आयोगाने दिले आहे. आयोगाने म्हटले आहे की, जर सार्वजनिक ठिकाणी जाहिराती दाखवण्यासाठी खास निश्‍चित जागा उपलब्ध करून दिली असेल आणि अशी जागा एखाद्या एजन्सीकडे व्यवस्थापन व पुढील वाटपासाठी आधीच दिली असेल, तर संबंधितांमार्फत जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना अशा जाहिरातींच्या जागेवर जाहिरात करण्याची समान संधी मिळेल  याची खात्री करेल. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने