काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे निश्चित.

 


काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आज, शनिवारी संपली. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार हे निश्चित झाले. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्या रूपाने दोन उमेदवार आमनेसामने असतील. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले की आतापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आमच्याकडे दोन उमेदवार आहेत. ठरल्या प्रमाणे 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असुन, 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे आणि थरूर यांच्यासह एकूण तीन नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. मिस्त्री यांनी सांगितले की, त्रिपाठी यांचा फॉर्म त्यांच्या एका प्रस्तावकाच्या सह्या जुळत नसल्याने त्यांचा फॉर्म नाकारण्यात आला आहे. पक्षाच्या अधिसूचने नुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 24ते 30 सप्टेंबर होती. आणि 8 ऑक्टोबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. 

तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे दोन्ही उमेदवार भक्कम नेते आहेत, दोघेही चांगले समजदार लोक आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने