शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पार्टीने चिन्ह आणि पक्षाचे नाव असलेले पोस्टर केले जारी.

 


शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने नवीन निवडणूक चिन्ह आणि नवीन पक्षाचे नाव असलेले पोस्टर जारी केले आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात पुढील महिन्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सोमवारी शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' असे नाव दिले आहे. त्यावर दोन्ही पक्षांनी समाधान व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, "नवीन चिन्ह, नवीन नाव 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)', आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा खूप अभिमान आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. लोकांसाठी काम करणारे प्रामाणिक असे आमचे सरकार होते." तसेच 'शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)'  या पक्षाने आपले नवीन चिन्ह आणि आणि नवीन पक्षाचे नाव असलेले पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर जारी केले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने